शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:33 IST

अकोला : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जल व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अकोला तालुक्यातील चिखलगाव व चांदूर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम, वीरवाडा व पारद इत्यादी पाच गावांसाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याच्या ठरावाला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची थकीत पाणीपट्टी तातडीने वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सभेत दिले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा आढावा सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सभापती रेखा अंभोरे, देवका पातोंड, समिती सदस्य श्रीकांत खोने, गोपाल कोल्हे, सरला मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सभेला गैरहजर ‘डीसीईओं’ना ‘शो-कॉज’ बजावण्याचे निर्देश!जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या सभेला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डीसीईओ) एस. एम. कुळकर्णी अनुपस्थित होते. या मुद्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याने ‘डीसीईओ’ कुळकर्णी यांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.

‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण करा! जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी ‘जलयुक्त शिवार’ची कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी संबंधित अधिकाºयांना दिले. तसेच कूपनलिकांच्या कामांचा आढावादेखील सभेत घेण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी