शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका हद्दवाढीतील भागासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:47 IST

अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

ठळक मुद्देहद्दवाढ झालेल्या भागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत २० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले.क्षेत्राच्या हद्दवाढीसाठी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे रेटा लावून धरला.

अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मनपा प्रशासनाने सादर केलेल्या ३१० कोटींच्या विकास आराखड्यांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असून, गुरुवारी २० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले आहेत.शहराचे अपुरे भौगोलिक क्षेत्रफळ व शहरालगतच्या गावांचा महापालिकेद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीसाठी अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे रेटा लावून धरला. फेब्रुवारी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहराची हद्दवाढ झाल्यास मनपाच्या माध्यमातून नवीन प्रभागात सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा भाजप लोकप्रतिनिधींचा मानस होता. त्यानुषंगाने मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या माध्यमातून आ. सावरकर यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आ. रणधीर सावरकर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सप्टेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी करीत हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुढील चार महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया २४ गावांतील हद्दवाढीचे सोपस्कार पूर्ण केले. मनपाच्या निवडणुकीत २० प्रभागांमधून ८० उमेदवारांपैकी भाजपाचे ४८ उमेदवार विजयी होऊन भाजपाने मनपात एकहाती सत्ता मिळवताच हद्दवाढ झालेल्या भागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. सभागृहात महापौर विजय अग्रवाल यांनी आराखडा मंजूर केल्यानंतर सात महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत २० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका