शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:11 IST

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली.

ठळक मुद्देपीएसी पावडरसाठी तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.श्री पार्श्व असोसिएट्स, नागपूर यांची निविदा १४.८४ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली. याकरिता मनपाला ३५ लाख ७६ हजार रुपये अदा करावे लागतील.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. या दोन्ही प्रकारच्या पावडर खरेदीसाठी प्रशासनाने ई-निविदा प्रक्रिया राबवली असता, जादा दराने प्राप्त झालेली निविदा मंजूर करावी लागली.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी सभापती विशाल इंगळे यांनी सभेचे आयोजन केले होते. सभेला सुरुवात होताचभाजपचे सदस्य अनिल गरड, शिवसेनेच्या मंजुषा शेळके यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. प्रभागातील ज्या भागात टँकरची गरज नाही, त्या परिसरात अवाजवी पाणी पुरवठा केला जात असल्याचा मुद्दा मंजुषा शेळके यांनी मांडला. सभेचे मागील इतिवृत्त मंजूर केल्यानंतर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पीएसी पावडरच्या पुरवठ्याबाबत प्राप्त निविदेवर चर्चा करण्यात आली. पीएसी पावडरसाठी तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी श्री पार्श्व असोसिएट्स, नागपूर यांची निविदा १४.८४ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली. याकरिता मनपाला ३५ लाख ७६ हजार रुपये अदा करावे लागतील, तसेच ब्लिचींग पावडरच्या पुरवठ्याबाबत पार्श्व असोसिएट्सने सादर केलेली १४.५५ टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली. यासाठी मनपाला १३ लाख १० हजार रुपये अदा करावे लागतील.जलकुंभावरून टॅँकरद्वारे पाणी पुरवठा बंद करा!शहरातील पाणीटंचाईच्या पृष्ठभूमिवर महापालिका प्रशासनाने चार जलकुंभांवरील मुख्य पाइप लाइनवर ‘टॅपिंग’क रून हायड्रंट तयार केले. या हायड्रंटवरून दररोज टॅँकरद्वारे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जात आहे. परिणामी, जलकुंभात पाणी साठवणुकीसाठी अधिक वेळ लागत आहे, तसेच पाण्याला दाब नसल्याने नळाद्वारे विलंबाने पाणी पुरवठा होत आहे. जलकुंभावरील हायड्रंट बंद करून मनपाने झोननिहाय पाण्याचे स्रोत शोधून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपचे विनोद मापारी, अनिल गरड, मंजुषा शेळके यांनी लावून धरली. त्याला सभापती विशाल इंगळे यांनी संमती दर्शवली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका