शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

महिला व बालकल्याणच्या जुन्याच योजनांना मंजुरी

By admin | Updated: June 6, 2017 00:50 IST

महिला व बाल विकास अधिकारी इतिवृत्तच देत नसल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून गेल्या वर्षात एकही योजना राबवण्यात आली नाही. त्या सर्व योजना चालू वर्षात राबवण्यासाठी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी सभेचे इतिवृत्त दोन-दोन महिने दिले जात नाही, त्यामुळे योजना रखडल्या, असे पत्र सभापती देवका दिनकर पातोंड यांना सातत्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावे लागल्याची बाबही पुढे आल्याने या विभागाच्या कारभाराची लक्तरे उघड झाली आहेत. महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिलेल्या प्रशिक्षणाच्या योजनांमध्ये महिला समुपदेशन केंद्र चालवणे, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणे, विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षण देणे, बेकिंग व केटरिंग प्रशिक्षण, नर्स व परिचारिकेचे प्रशिक्षण, सौंदर्य प्रसाधने प्रशिक्षण, मराठी-इंग्रजी टायपिंग, शिवणकाम फॅशन डिझायनिंग, स्वसंरक्षण विकास प्रशिक्षण, सेल्स गर्ल्स प्रशिक्षण, शोभिवंत फळझाडांची लागवड करणे या योजनांचा समावेश आहे. तर कुक्कुटपालन, कुपोषित मुलांसाठी, गरोदर महिला, स्तनदा मातांसाठी अतिरिक्त पौष्टिक आहार पुरवठा करणे, लेडिज सायकल पुरवणे, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, पिठाची चक्की पुरवणे, अंगणवाडीत डेस्क-बेंच पुरवठा करणे, अंगणवाडीत वजनकाटे पुरवठा करणे, लोखंडी कपाट पुरवठा करणे या योजनांसाठी तरतूद करून मंजुरी देण्यात आली. यावेळी समिती सदस्या मंगला तितूर, माया कावरे, ज्योत्स्ना बहाळे, आशा एखे, वेणू चव्हाण, रमजाबी शेख साबीर, मंजूषा वडतकार, माधुरी कपले यांच्यासह महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे उपस्थित होते. दोन सभांचे इतिवृत्तच दिले नाहीगेल्या वर्षी एप्रिलमध्येच महिला व बालकल्याण समितीने योजनांना मंजुरी दिली. त्या योजना राबवण्यासाठी पुढील कारवाई करणाऱ्या महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी तब्बल आठ महिने फाइल पुढे सरकवलीच नाही. त्यामुळे योजना राबवल्याच गेल्या नाहीत, असे सभापती पातोंड यांनी सांगितले. चालू वर्षातही तोच प्रकार घडत आहे. समितीच्या १३ एप्रिल व ८ मे रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त ५ जूनपर्यंतही देण्यात आले नाही. त्यासाठी समितीच्या बैठकीपूवी इतिवृत्ताची मागणी पत्राद्वारे केल्यानंतरही ते देण्यात आले नाही. त्यामुळे अधिकारीच योजना राबवण्यात अडसर निर्माण करतात, असेही पातोंड यांनी सांगितले.