शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजुरी;  ‘बीपीएमएस’प्रणाली कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:43 IST

‘बीपीएमएस’द्वारे नकाशा मंजूर होत नसल्याची बाब हेरत शहरातील काही बड्या दलालांनी ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात इमारतीचा नकाशा मंजूर करण्यासाठी शासनाच्या महाआयटी विभागाने ‘बीपीएमएस’( बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली कार्यान्वित केली. नकाशा मंजुरीसाठी ही प्रणाली कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. ‘बीपीएमएस’द्वारे नकाशा मंजूर होत नसल्याची बाब हेरत शहरातील काही बड्या दलालांनी ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावल्याची माहिती आहे. मनपानेसुद्धा काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आॅफलाइन पद्धतीने नकाशा मंजूर करण्याचे धोरण स्वीकारले असले तरी ही बाब नियमबाह्य पद्धतीने नकाशा सादर करणाऱ्या दलालांच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे.महापालिका क्षेत्रात कमर्शियल कॉम्पलेक्स, रहिवासी इमारतींचे निर्माण करण्यासाठी नगररचना विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागात नकाशा सादर करावा लागतो. वर्षभरापूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर नगररचना विभागाकडे ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केला जात होता; परंतु या पद्धतीमुळे मालमत्ताधारकांना जाणीवपूर्वक झुलवत ठेवण्याचे प्रमाण वाढले होते. नकाशा वेळेवर मंजूर होत नसल्याने व बांधकाम दाखले देताना अनाठायी वेळ खर्ची होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर महापालिकांनी नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणालीचा आग्रह धरला. यामध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करून त्याचा कंत्राट पुणे येथील इन्फोटेक कंपनीला देण्यात आला होता. कालांतराने आॅटोडीसीआरच्या नियमावलीत एकसूत्रता नसल्याचे शासनाच्या निदर्शनास येताच माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करून महाआयटी विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेत ‘बीपीएमएस’(बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली कार्यान्वित केली. या कामासाठी शासन स्तरावरून एजन्सी नियुक्त केली. मागील काही महिन्यांपासून या प्रणालीतही तांत्रिक दोष असल्याची ओरड सुरू झाल्यामुळे नकाशा मंजुरीची प्रकरणे रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.विशिष्ट प्रकरणांमध्येच ‘आॅफलाइन’का?मनपाच्या नगररचना विभागात घिरट्या घालणाºया काही उच्चभ्रू दलालांनी सादर केलेल्या फाइल ‘आॅफलाइन’ पद्धतीने मंजूर केल्या जात असल्याची माहिती आहे. मनपा पदाधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनुसार संबंधित दलाल या विभागात ‘अ‍ॅक्टिव्ह’असल्याची माहिती आहे. प्रशासनाने सरसकट सर्वच प्रस्ताव ‘आॅफलाइन’ पद्धतीने मंजूर करणे भाग असताना विशिष्ट प्रस्तावांनाच मंजुरी दिली जात असल्याने मनपाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

अपलोड नकाशा दिसतच नाही!‘बीपीएमएस’प्रणाली अंतर्गत बांधकामाचा नकाशा सादर करण्यासाठी नागरिकांना संकेतस्थळ उपलब्ध आहे. नागरिकांना घरबसल्या नकाशा सादर करण्यासोबतच इतर कागदपत्रे अपलोड करता येतील, असा दावा मनपाकडून केला जात होता. बांधकामाचा नकाशा या संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर तो संबंधित उपअभियंता, सहायक नगररचनाकार तसेच नगररचनाकार यांच्याकडे क्रमवारीने न जाता मधातच गहाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नकाशा व इतर दाखले देण्यासाठी ‘आॅफलाइन’पद्धतीचा वापर करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला