शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या अंदाजपत्रकाला ‘स्थायी’ची मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:00 IST

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षातील २२८.५२ कोटींच्या उत्पन्नाचे अंदाजपत्रक शुक्रवारी मनपाच्या स्थायी समितीसमोर सादर केले.

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षातील २२८.५२ कोटींच्या उत्पन्नाचे अंदाजपत्रक शुक्रवारी मनपाच्या स्थायी समितीसमोर सादर केले. उत्पन्न व जमाखर्चाची आकडेवारी नमूद करताना प्रशासनाने ८.४२ कोटींच्या शिलकीचा बजेट सादर केला. त्यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करणार असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले.महापालिक ा आयुक्त संजय कापडणीस यांनी अवाजवी खर्च व तरतुदींना फाटा देत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ‘रिअ‍ॅलिस्टिक’ अर्थसंकल्प सादर करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. आयुक्त कापडणीस यांनी चालू आर्थिक वर्षासाठी २२८.५२ कोटींचे उत्पन्न आणि २२८.०३ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्याकडे सादर केले. जमा व खर्चाच्या एकूण ५३६.४३ कोटींच्या अंदाजपत्रकात स्थायी समिती सदस्यांनी दुरुस्त्या सुचवून त्यानुसार आर्थिक तरतूद करण्याचे नमूद केले असता, आयुक्त कापडणीस यांनी सदस्यांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याचे निर्देश दिले. सूचनांचा अंतर्भाव केलेला अर्थसंकल्प महासभेसमोर सादर केला जाणार आहे. सभापती विशाल इंगळे यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशासनाला दुरुस्त्या सुचविल्या. सभेला नगरसेवक बाळ टाले, विनोद मापारी, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, नगरसेविका मंजूषा शेळके, शारदा खेडकर, नंदा पाटील, उषा विरक यांच्यासह इतर सदस्य, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.हद्दवाढीसाठी विशेष तरतूद करा!स्थायी समिती सदस्य सुनील क्षीरसागर, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठ्याच्या कामांचा समावेश करण्याची मागणी केली.महिला व बालकल्याणवर ताशेरेमहिला व बालकल्याण समितीने मागील दोन वर्षांपासून गरजू महिलांना विविध योजनांचा लाभ दिला नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मंजूषा शेळके, अ‍ॅड. धनश्री देव यांनी लावून धरला. हा विभाग कागदोपत्री कामकाज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका