शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ४६५ पदांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:32 IST

१०१६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय संचालकांनी केवळ ४६५ पदांनाच मंजुरी दिली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला : केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून तयार झालेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रशासनातर्फे ४६५ कर्मचाºयांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे; परंतु मंजूर पदांची संख्या ही अतिशय कमी असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे १०१६ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात आली होती; मात्र वैद्यकीय संचालकांनी ७७८ पदांसाठी वैद्यकीय शिक्षा सचिव यांच्याकडे शिफारस केली होती.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १ जानेवारी २०१४ मध्ये १५० कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला होता. ज्यामध्ये १२० कोटी रुपये केंद्र शासनातर्फे, तर ३० कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते. रुग्णालयाच्या इमारतीचे निर्माण कार्य जवळपास पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणेही येऊ लागली आहेत; परंतु रुग्णालय संचालित करण्यासाठी येथे पदच मंजूर नव्हते. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य विभागाकडे १०१६ पदांची आवश्यकता असल्याचे सांगत तसा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर वैद्यकीय संचालकांकडून ही पदसंख्या कमी करून ७७८ पर्यंत कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केवळ ४६५ पदांनाच मंजुरी दिली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मंजूर पदभरतीनंतर लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघणार असल्याने अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना गंभीर आजारासाठी नागपूर किंवा मुंबईला जावे लागणार नाही.या विभागातील राहणार तज्ज्ञ!कर्करोगशास्त्रकिडनीशास्त्रएंडोक्राइनालाजीहृदयरोगशास्त्रसीटीव्हीएसन्यूरोलॉजी (स्नायू विज्ञान)न्यूरो सर्जरीअकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १०१५ पदांची मागणी केली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकाºयांसह इतर आवश्यक कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला होता. हा प्रस्ताव पाठविल्यानंतर ४६५ पदांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.- डॉ. कुुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल