शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन महत्वाचे: ‘प्रभात’मध्ये वित्तीय साक्षरतेवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:21 PM

अकोला : कमी आर्थिक उत्पन्न असणे ही मूळ समस्या नसून उपलब्ध पैशाचे गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन नसणे हे आर्थिक समस्येचे कारण असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. पंकज वाकोडे यांनी प्रतिपादन केले. 

ठळक मुद्देभारत सरकारच्या उपक्रमांतर्गत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाद्वारे  प्रभात किड्स स्कूल येथे कार्यशाळा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स संचालक डॉ गजानन नारे होते.  विविध बँका, विमा कंपनी, निवृत्तीवेतन योजना तसेच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.

अकोला : कमी आर्थिक उत्पन्न असणे ही मूळ समस्या नसून उपलब्ध पैशाचे गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन नसणे हे आर्थिक समस्येचे कारण असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. पंकज वाकोडे यांनी प्रतिपादन केले. भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाद्वारे  प्रभात किड्स स्कूल येथे घेण्यात आलेल्या  वित्तीय शिक्षण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स संचालक डॉ गजानन नारे होते. आर्थिक साक्षरतेबद्दल जागरुकता सत्रात त्यांनी विविध वित्तीय योजनाबाबत मार्गदर्शन केले. बहुतेक वेळा बचत आणि गुंतवणुकीतील फरकच स्पष्ट नसतो. बचत ही अल्पकालीन असते आणि त्यातून मिळणारा परतावा देखील अत्यल्प असतो. तर गुंतवणूक ही दीर्घकालीन असते व त्यातून मिळणारा परतावा अधिक असतो, मात्र गुंतवणुकीसाठी आर्थिक नियोजन व शिस्त याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या योजनेत गुंतवणूक केली जात आहे, त्या योजनेबाबत पूर्ण खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.   सुरक्षितता, परतावा आणि  लिक्विडीटी असलेल्या योजनांमध्ये तसेच योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध वित्तीय सुविधांवर व तसेच विविध बँका, विमा कंपनी, निवृत्तीवेतन योजना तसेच शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. आरबीआय, सेबी, आयआरडीए सारख्या नियंत्रक संस्थांमुळे आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आली असल्याचे ते म्हणाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मल्टी सेक्टर फंडाची निवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच विविध वित्तीय सेवांचा लाभ घेताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी   डॉ.गजानन नारे यांनी  प्रा. पंकज वाकोडे यांचे स्वागत केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रभात किड्स स्कूलचे व्यवस्थापक अभिजित जोशी यांनी केले. प्रभातच्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाNयांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा