शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील रोहयो कामांच्या तपासणीसाठी दहा पथकांची नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:20 IST

दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने, पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील पातूर तालुक्यात रोहयोच्या कामांत अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली होती. तसेच पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची विशेष तपासणी पथकाकडून सखोल तपासणी करण्याची विनंतीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पातूर तालुक्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश असलेल्या दहा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांत अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यामध्ये पथक प्रमुख म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सदस्य म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता तसेच तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनांचा समावेश आहे. यासोबतच या कामांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार, कार्यकारी अभियंता डी. पी. गव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, लेखाधिकारी जी. एम. चौधरी इत्यादी चार सनियंत्रण अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूर