शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आता मानधनावर होईल उपायुक्त पदासाठी नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:01 IST

अकोला: मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपासह राज्य शासन उदासीन असल्याचे चित्र आहे.

अकोला: मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपासह राज्य शासन उदासीन असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय कारभार विस्कळीत होत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आता रिक्त असलेल्या उपायुक्त पदासाठी मानधनावर सेवानिवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, तसा आदेश जारी केला आहे. अकोला महापालिकेची राज्यात असणारी ख्याती लक्षात घेता मनपा आयुक्तांचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.मनपातील उपायुक्तांची दोन्ही पदे रिक्त असून, कहर म्हणजे मुख्य लेखा परीक्षकाचे पदही रिक्त आहे. शहर अभियंता पदासह विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याचा परिणाम मनपाच्या प्रशासकीय कारभारावर होत आहे. उपायुक्त सुमंत मोरे यांची बदली झाल्यानंतर आज रोजी उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त विकास या दोन्ही पदांचा सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पूनम कळंबे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. रिक्त पदांवर सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शासनाकडे वारंवार शिफारस पत्र सादर केल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून केला जातो. त्यानुषंगाने शासनाने उपायुक्त पदासाठी नुकतेच विजयकुमार म्हसाळ यांचा नियुक्ती आदेश जारी केला. अद्याप म्हसाळ मनपात रुजू न झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. या सर्व बाबी ध्यानात घेता तसेच प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावर आणण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी उपायुक्त पदासाठी थेट मानधन तत्त्वावर सेवानिवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश त्यांनी जारी केले आहेत.वाशिम येथील अधिकाºयाची होणार नियुक्ती!मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी वाशिम जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केल्याची माहिती आहे. मनपात आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वी संजय कापडणीस वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत होते, हे येथे उल्लेखनीय.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका