नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाशिम जिल्ह्यातल्या एका हत्याप्रकरणातील आरोपीचे जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.संजय जनार्दन वार (४२) असे आरोपीचे नाव असून तो लाठी, ता. मंगरुळपीर येथील रहिवासी आहे. वाशीम सत्र न्यायालयाने ३0 मे २0१२ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३0२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व २000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील वविध बाबी लक्षात घेता त्याचे अपील फेटाळून लावले.मृताचे नाव उत्तम भगत होते. तो नाशिक येथील कंपनीत वाहनचालक होता. खटल्यातील माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २00८ रोजी सकाळी आरोपी संजयने उत्तमची तलवारीने भोसकून हत्या केली. उत्तमचे संजयच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे तो घटनेच्या १५ दिवसांपासून उत्तमचा शोध घेत होता. उत्तम गावात परतताच संजयने त्याची हत्या केली. मंगरुळपीर पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.
जन्मठेपेविरुद्धचे अपील फेटाळले
By admin | Updated: October 24, 2014 23:15 IST