अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. सोमवार, १२ आॅक्टाबर रोजी पातुर तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५६ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये तीन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८२० झाली आहे. दरम्यान, १३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जीएमसी, गीता नगर व जठार पेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.उमरा पांगरा येथील पुरुषाचा मृत्यूसोमवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर तालुक्यातील उमरा पांगरा येथील ५९ वर्षीय पुरुष असून, त्यांना ९ आॅक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.१३३ जणांना डिस्चार्जसोमवारी तब्बल १३३ जण कोरोनामुक्त झाले. कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर हेंडज, मुर्तिजापूर येथून ६२, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ३९ अशा एकूण १३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.३८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,१८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आणखी एक बळी; तीन पॉझिटिव्ह, १३३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:04 IST