शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

  कोरोनाचा आणखी एक बळी; एक पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ११० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:44 IST

रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बाळापूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे.एकूण रुग्णसंख्या २६६७ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या विषाणूने गत चार महिन्यांपासून कहर केला आहे. रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बाळापूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे. तर रविवारी आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६६७ झाली आहे.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांचे प्रमाणही जिल्ह्यात लक्षणीय आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १२९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सिंधी कॅम्प येथील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २६६७ झाली आहे.८१ वर्षीय वृद्ध दगावलाकोरोनाच्या बळींची संख्या वाढतच असून, रविवारी बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.४४३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २११४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBalapurबाळापूरAkolaअकोला