अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. रविवार, ३ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७,६०९ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये पाच महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये हिंगणा फाटा येथील चार जणांसह डाबकी रोड येथील दोन, पारडी, बार्शीटाकळी, जवाहर नगर, मोठी उमरी, जीएमसी , गीरीनगर, मलकापूर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.५० वर्षीय पुरुषाचा मृत्यूरविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण बस स्टँड, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून, त्यांना १ आॅक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.१,०३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६३३० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,०३५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाचा आणखी एक बळी; १४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:16 IST