शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आणखी एक बळी; ७७ नवे पॉझिटिव्ह; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १०६८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:39 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७९३ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ७७ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४७९३ वर गेला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७७ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २२ महिला व ५५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १५ मुर्तिजापूर येथील, गौरक्षण रोड येथील सात, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, महान व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तोष्णीवाल लेआऊट, जीएमसी क्वॉटर, कौलखेड, पळसो बढे, जवाहर नगर, शेकापूर ता. पातूर, केशव नगर, रणपिसे नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, वासूदेव नगर, बार्शीटाकळी, साखरविरा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, आलेगाव, नागे लेआऊट, व्हिएचबी कॉलनी, गोयका नगर, भंडारज ता. पातूर, आरपीटीएस, गजानन पेठ, स्टेशन रोड, राजूरा प्लॉट, रेडवा ता. बार्शिटाकळी, सोपिनाथ नगर, खडकी, कृषी नगर, वाशिम बायपास, न्य तारफैल व खेतान नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.लहान उमरी येथील वृद्धचा मृत्यूमंगळवारी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून, त्यांना ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला करण्यात आले होते. उपचारास दाद न दिल्याने त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.१०६८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५५८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०६८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या