शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
5
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
6
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
7
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
9
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
10
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
11
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
12
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
13
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
14
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
15
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
16
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
17
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
18
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
19
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
20
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच

कोरोनाचा आणखी एक बळी; ३४ पॉझिटिव्ह, ६३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 18:36 IST

मुर्तीजापूर शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४४ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. रविवार, २३ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४४ झाली आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये ७ असे एकूण ३४ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४७५ झाली असून, ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल ३७० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १२ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील नऊ जण, तेल्हारा तालुक्यातील चांगेफळ व पाथर्डी येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, नायगाव, जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर, राजराजेश्वर नगर, शिवसेना वसाहत, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मुर्तीजापूर येथील वृद्ध दगावलारविवारी मुर्तीजापूर शहरातील कोकणवाडी भागातील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णास १८ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.रॅपिड चाचण्यांमध्ये सात पॉझिटिव्हरविवारी दिवसभरात झालेल्या १४१ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यामध्ये सात जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात सहा, तर आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी एकअसे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११४०२ चाचण्यांमध्ये ५९० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.६३ जणांना डिस्चार्जरविारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून सहा अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३२७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३००४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३२७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या