शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आणखी एक बळी; १६ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:27 IST

अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे. तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२७५ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील सहा जणांसह, दहिगाव गावंडे येथील चार, अकोला शहरातील गड्डम प्लॉट येथील दोन, सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यूजुने शहरातील सिद्धार्थनगर भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.४४३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २६९५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला