शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:03 AM

आणखी १ हजार मृत्यू लपविले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अकोला : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते असून, राज्य सरकार मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करत आहे. यापूर्वी सरकारने १,३२८ मृत्यू लपविले होते. ते जाहीर करावे लागले असून, आता आणखी १ हजार मृत्यू लपविले असल्याचा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.सोमवारी त्यांनी अकोल्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू हे महाराष्टÑात आहेत; मात्र राज्य सरकार गांभीर्याने काम करत नाही. कोरोनाशी लढाई करण्यापेक्षा हे सरकार आकड्यांशी खेळत असल्याचा आरोप करून या सरकारने १ हजार मृत्यूंची लपवाछपवी केली असून, या आकडेवारीचा शोध घेतला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी याची माहिती सरकारला दिली असून, त्यांनी २९ जूनपर्यंतची सर्व माहिती गोळा करून याबाबत माहिती दिली जाईल, असे सरकारने कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.सोयाबीन बियाणे न उगविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; मात्र कंपनी कायद्यानुसार त्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकºयांना अतिरिक्त मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भ वैधानिक मंडळाला एका ज्येष्ठ मंत्र्याचा विरोधविदर्भ वैधानिक मंडळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर एका ज्येष्ठ मंत्र्याने या मुदवाढीला विरोध केल्यामुळेच या मंडळाला मुदतवाढ मिळू शकली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. विदर्भातील सर्व मंत्री, आमदार व खासदारांनी या संदर्भात एकत्रित आवाज उठविला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला