शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २२ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:53 IST

coronaVirus News आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३३८ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे सत्र सुरूच असून, बुधवार ३ फेब्रुवारी रोजी शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३३८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,६८७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील तीन, अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, खरप, कौलखेड, खडकी, पणन ता. अकोट, मचाणपूर ता. अकोट, पिंपळखुटा ता. अकोट, राऊतवाडी, आझाद नगर, जवाहर नगर, अजय कॉलनी व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी बोरगाव मंजू येथील दोन, कोठारी व शिवाजी नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

६८ वर्षीय पुरुष दगावला

खाजगी रुगणालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधिताचा बुधवारी मृत्यू झाला. हा रुग्ण पिल कॉलनी, एमआयडीसी रोड, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष असून, त्यांना २५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

१९ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

७१६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६८७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या