शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

अकोल्यात आणखी ३३ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३०५३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:14 IST

३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०५३ वर पोहचली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, १० आॅगस्ट रोजी जिल्हाभरा आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०५३ वर पोहचली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३५४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२१ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३३ रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती येथील सहा जण, रिधोरा येथील चार जण, अकोट, जठारपेठ, हिवरखेड येथील प्रत्येकी तीन जण, बार्शीटाकळी येथील दोन जण, शिवणी, गौरक्षण रोड, गीता नगर, केळकर हॉस्पीटल, सुधीर कॉलनी, मोठी उमरी, माना, पातूर, सिव्हील लाईन, पिंपरी ता अकोट, दहिगाव गावंडे ता.अकोला व वाल्पी ता.बाशीर्टाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.५२२ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या