शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अकोला जिल्ह्यात आणखी २४८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 15:44 IST

coronavirus news आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३६ अशा एकूण २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवार, १५ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३६ अशा एकूण २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,८४७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १४, मोठी उमरी येथील ११, गोरक्षण रोड व मलकापूर येथील आठ, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी सात, डाबकी रोड येथील सहा, सहकार नगर येथील पाच, न्यु राधाकिसन प्लॉट, कौलखेड, खेडकर नगर, रतनलाल प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, शिवनगर, बाळापूर, गणेश नगर, हिंगणा रोड, रजपूतपुरा, अकोट, लहरिया नगर, सोमथाना व शिवणी येथील प्रत्येकी तीन, खडकी, आनंद नगर, पातूर, आळशी प्लॉट, तापडीया नगर, जूने शहर, इंद्रिरा नगर, आदर्श कॉलनी, गांधी रोड, गुडधी, अनिकट, शिवसेना वसाहत, खोलेश्वर, माणिक टॉकीज, अंबर न्यायधीस निवारा, राऊतवाडी, मुर्तिजापूर, कैलास टेकडी, संतोष नगर व अंनत नगर येथील प्रत्येकी दोन, भिम नगर, कोठारी वाटीका, शिवाजी नगर, संग्रामपूर, पत्रकार कॉलनी, कृषी नगर, शास्त्री नगर, बिर्ला कॉलनी, बार्शीटाकळी, न्यु भिम नगर, देशमुख फैल, स्वालंबी नगर, जीएमसी क्वॉटर, गांधी नगर, परिवार कॉलनी, मानिक टॉकीज, टेलीफोन कॉलनी, एमआयडीसी, मोमीनपुरा, तारफैल, शास्त्री नगर, वाशिंबा, म्हाडा कॉलनी, वाशिम बायपास, खरप रोड, तोष्णीवाल लेआऊट, आंबेडकर चौक, शंकर नगर, दुर्गा नगर, मोहाळी सांगवी, चोहट्टा बाजार, शंकर नगर, गांधी रोड, कृषी नगर, पारस, उमरी, जठारपेठ, गायत्री नगर, तिलक रोड, गंगाधर प्लॉट, केशव नगर, जूने आरटीओ, महात्मा फुले नगर, मुलानी चौक, तुकाराम चौक,माधव नगर, गाडगे नगर, सांगवी बाजार, ज्ञानेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, गणेश नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, भारती प्लॉट, मालीपुरा, गायगाव, संत कवर नगर व बाभूळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५,४३२ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,८४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०२ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ५,४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला