अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे सत्र सुरुच असून, रविवार १ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४१६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये कौलखेड व खडकी येथील प्रत्येकी दोन जणांसह पक्की खोली सिंधी कॅम्प, चौरे प्लॉट, शास्त्री नगर, वरुड जवळका, जीएमसी हॉस्टेल, रामदास पेठ, सिंधी कॅम्प, गणेश नगर, राऊत वाडी, मराठा नगर, मोठी उमरी, कपिलवस्तू , छोटी उमरी व पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.२३३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४१६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २३३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 11:56 IST