शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चार मतदारसंघांसाठी आणखी १ हजार ४00 ‘बॅलेट युनिट’!

By admin | Updated: October 8, 2014 00:55 IST

आकोट, बाळापूर, अकोला पूर्व, मूर्तिजापूर मतदारसंघाचा समावेश.

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अकोला पश्‍चिम मतदारसंघ वगळता इतर चार म तदारसंघात उमेदवारांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांसाठी आवश्यक असलेले १ हजार ४00 ह्यबॅलेट युनिटह्ण निवडणूक आयोगामार्फत मंगळवारी प्राप्त झाले. प्राप्त झालेले बॅलेट युनिट चारही मतदारसंघात वितरित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र १ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले. त्यामध्ये अकोला पूर्व २५, अकोला पश्‍चिम १५, आकोट १८, बाळापूर १६ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे घेण्यात येत असलेल्या मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रांच्या ह्यबॅलेट युनिटह्णवर एकूण १६ बटण असतात, त्यामध्ये १५ उमेदवारांच्या नावांसमोरील बटणांसह १६ व्या क्रमांकावर ह्यनोटाह्णचे बटण असते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी उपलब्ध एकूण १ हजार ८३९ बॅलेट युनिटपैकी १ हजार ३६७ बॅलेट युनिट यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात वितरित करण्यात आले. उर्वरित ४७२ बॅलेट युनिट जिल्हा निवडणूक विभागाकडे आरक्षित आहेत; मात्र अकोला पश्‍चिम मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अकोला पूर्व, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याने, या चारही मतदारसंघात मतदान प्रक्रियेत दुप्पट ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी १ हजार २८ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा निवडणूक विभागामार्फत गुरुवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुषंगाने आकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजा पूर या चार मतदारसंघांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ठाणे येथून १ हजार ४00 ह्यबॅलेट युनिटह्ण मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या बॅलेट युनिटचे रॅन्डमायझेशन करून चारही मतदारसंघात वितरित करण्याचे काम मंगळवारीच सुरू करण्यात आले, असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) उदय राजपूत यांनी सांगितले.

** मतदान यंत्रांना आज लागणार सील!

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात १५ ऑक्टोबर रोजी होणार्‍या म तदानासाठी इलेक्टॉनिक मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) वाटप करण्यात आले आहे. विधानसभा म तदारसंघनिहाय वाटप करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी ह्यसीलह्ण लावण्यात येणार आहे. अकोला पश्‍चिम व अकोला पूर्व या दोन मतदारसंघांच्या मतदान यंत्रांना अकोल्यातील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे ह्यसीलह्ण लावण्याचे काम करण्यात येणार आहे, तर उर्वरित तीन मतदारसंघातील मतदान यंत्रांना संबंधित मतदारसंघांच्या ठिकाणी सील लावण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया होणार आहे.