खामगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला कृषी महाविद्यालय मिळाल्याने कृषी शिक्षण क्षेत्रासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र या आधीच बुलडाण्यात असून, चार खासगी कृषी महाविद्यालये सुरू आहेत. या केंद्रासोबतच कृषी महाविद्यालयांनी शेतीसंदर्भातील संशोधनात महत्त्वाची कामगिरी सुरू केली असून, शेतकर्यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी महाविद्यालयाची घोषणा करून जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे. शासनाच्या या घोषणेनुसार कृषी महाविद्यालय हे बुलडाणा परिसरात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असून, त्याचा लाभ जिल्हाभरातील कृषी क्षेत्राला होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याने, हे महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. चार खासगी महाविद्यालये कार्यरतबुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये चार खासगी कृषी महाविद्यालये कार्यान्वित असून, हे सर्व महाविद्यालय डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्नीत आहेत. बुलडाणा, जळगाव जामोद, हिवरा आङ्म्रम व देऊळगावराजा येथे असलेल्या या महाविद्यालयांच्या जोडीला आता शासकीय महाविद्यालय येऊ घातले आहे.
कृषी महाविद्यालयाची अर्थसंकल्पात घोषणा
By admin | Updated: March 19, 2016 00:40 IST