शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना कार्यालयात डांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 03:04 IST

आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देआलेगावचा पाणी प्रश्न पेटला आश्‍वासनानंतर परिस्थिती निवळली!

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तेथे पोहोचलेल्या चान्नी पोलिसांनी तातडीची सभा घेऊन त्यामध्ये पाणीटंचाईच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून वदवून घेतल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.गेल्या चार दिवसांपूर्वी आलेगावच्या नागरिकांनी पाणीटंचाईच्या मुद्दय़ावर ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा आणून पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे निवेदन सादर केले होते; मात्र निष्क्रिय ग्रामपंचायतीने त्याची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच अरुणा तेलगोटे, ग्रामसेवक नंदू सोलंके यापैकी कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये उपस्थित असणार्‍या तीन ते चार कर्मचार्‍यांना आतमध्येच कोंडून ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरुन कुलूप लावून घेतले. दरम्यान, या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाने आपणही याठिकाणी कोंडले जाऊ, या भीतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारुन तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला असून, ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात आल्याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खार्डे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली, तर या घटनेची माहिती मिळाल्यावर उशिराने पोहोचलेले सरपंच अरुणा तेलगोटे, उपसरपंच नवलकिशोर काठोळे, ग्रामसेवक नंदू सोलंके यांना सोबत घेऊन पोलिसांनी ग्रामपंचायतीला लावण्यात आलेले कुलूप उघडले आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये एक तातडीची सभा घेण्यात आली. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांकडून आलेगावातील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा काढून समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन घेऊन तोडगा काढण्यात आल्यावर वातावरण निवळले. चोंढी धरणाचे पाणी नदीत सोडल्यास गावातील पाण्याची पातळी वाढेल, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली. या धरणाचे इतर ठिकाणी देण्यात येणारे पाणी पुरविल्यावर शिल्लक राहणारे पाणी तरी सोडण्यात यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायत