शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ला मुदतवाढ नाही; अन् दंडही ठोठावला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:03 IST

मुदत संपुष्टात आल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कंपनीला दंडाची आकारणी केली नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असताना मनपा प्रशासनासह पारदर्शी कामकाजाचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे की काय, संबंधित कंपनीची काम करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून कंपनीला दंडाची आकारणी केली नसल्याचे समोर आले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी शासनाने ११० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यापैकी मनपा प्रशासनाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली होती. त्यावेळी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ नामक कंपनीची जादा दराची निविदा स्वीकारण्यात आली. कंपनीच्यावतीने शहरात सर्व निकष-नियम बासनात गुंडाळून ठेवत जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सातत्याने केला जात आहे. निकषानुसार किमान साडेतीन फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता कंपनीकडून अवघ्या सव्वा ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात आहे. यादरम्यान, जलवाहिनीच्या कामासाठी कंपनीला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत डिसेंबर २०१९ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर महापालिकेने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली. आता कंपनीला तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागणार असून, मुदतवाढीच्या कालावधीत कंपनीने काम सुरूच ठेवल्यास प्रशासनाने दंड आकारणे अपेक्षित होते.

मुदतवाढीसंदर्भात कंपनीचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला आहे. यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका