शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:39 IST

परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; परंतु तांत्रिक अडचणींमुळे या परीक्षा पुन्हा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या. एमए (राज्यशास्त्र) भाग २ च्या चार विषयांऐवजी प्रवेश पत्रावरच तीनच विषय दिले होते.कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रेंगाळल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; मात्र राज्यात अकृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नव्या वेळापत्रकानुसार या परीक्षा १२ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता या परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार होत्या; परंतु तांत्रिक अडचणींमुळे सोमवारपासून सुरू होणाºया परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या सुधारित तारखांची घोषणा येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

ज्या पद्धतीने महाविद्यालय स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतल्या आहे त्याच पद्धतीने पेपरलेस आॅनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी आता विद्यापीठाने महाविद्यालयावर टाकावी. विद्या परिषद सभेत मी ठेवलेला प्रस्ताव सुद्धा खूप चांगला होता तो प्रस्ताव दुर्लक्षित झाला नसता तर आता पर्यंत निकालही घोषित झाले असते.- डॉ. आर. डि. सीकची,अध्यक्ष सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रिय प्राचार्य फोरम

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठexamपरीक्षा