शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक उपस्थिती पद्धतीतून अमरावती, लातूर विभाग वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:51 IST

शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.

ठळक मुद्देआपल्या क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केले जाते. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत शिकणाºया विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकांना कमी अन् क्लासेसमध्ये अधिक उपस्थित असतात.

- नितीन गव्हाळे

अकोला: राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी तासिका हजेरी लावावी, या उद्देशाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु यातून शासनाने अमरावती आणि लातूर विभाग वगळल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक कोचिंग क्लासेस अमरावती आणि लातूर विभागात आहेत. त्यांच्या दबावातूनच शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.विज्ञान शाखेचे विद्यार्थी केवळ नावाला इयत्ता अकरावीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. या ठिकाणी उपस्थिती बंधनकारक नसल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देतात. त्यामुळे राज्यात सर्वत्रच कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. एवढेच नाही तर अनेक कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केले जाते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी तर खासगी कोचिंग क्लासेस वर्गांसोबत सामंजस्य करार केल्याचेसुद्धा शासनानेच म्हटले आहे. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिका नियमित हजर राहत नसल्यामुळे शासनाने अमरावती व लातूर विभाग वगळून राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत शिकणाºया विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली. शासनाने कोचिंग क्लासेसचा दाखला देत, हा निर्णय घेतला खरा; परंतु ज्या अमरावती व लातूर विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहेत, त्याच विभागाला बायोमेट्रिक उपस्थितीतून शासनाने कसे काय वगळले, याचेच कनिष्ठ महाविद्यालय संचालकांना आश्चर्य वाटत आहे. शासनाने स्वत:च्याच निर्णयाला हरताळ फासला आहे. शासनाने हे दोन्ही विभाग जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच!बायोमेट्रिक पद्धतीतून वगळलेल्या अमरावती विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस अकोला, अमरावती शहरांमध्ये आहेत. लातूर विभागातसुद्धा लातूर, परभणी, नांदेड शहरामध्ये सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहे. त्यामुळे या भागासाठी बायोमेट्रिक पद्धत अत्यंत गरजेची होती. येथील कोचिंग क्लासेसमुळे कनिष्ठ महाविद्यालये केवळ प्रवेशापुरती उरली आहेत. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकांना कमी अन् क्लासेसमध्ये अधिक उपस्थित असतात. त्यामुळे अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच. 

शासनाने सर्वच विभागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धती लागू केली; परंतु यातून अमरावती व लातूर विभाग वगळून शासनाला काय साध्य करायचे आहे? महत्त्वाचे सर्वाधिक शिकवणी वर्ग याच भागात आहेत. महाविद्यालयांमध्ये तासिका नियमित झाल्या तर गरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. गरीब विद्यार्थी शिकवणी वर्गाची महागडी फीस भरू शकत नाहीत.प्रा. विवेक डवरे, अध्यक्ष, आदर्श महाविद्यालय. 

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक