शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 10:26 IST

सर्व शिक्षक संघटनांनी निवडणुकीची तयारी केली; परंतु या तयारीवर कोरोनाने पाणी फेरले आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यातून राजकीय क्षेत्रही सुुटू शकलेले नाही. विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा सहा वर्षांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला आहे. कोरोनामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सर्व शिक्षक संघटनांनी निवडणुकीची तयारी केली; परंतु या तयारीवर कोरोनाने पाणी फेरले आहे. शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत ३५ हजारावर शिक्षकांनी मतदार नोंदणी केली आहे.विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता होती; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली नाही. त्यामुळे निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. निवडणूक लांबली असली, तरी कधीही निवडणुकीची अधिसूचना निघू शकते. या अपेक्षेने इच्छुक उमेदवार मतदार संपर्कावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीपूर्वी निवडणूक विभागाने मतदार याद्या तयार करण्याचे काम विभागीय स्तरावरून सुरू केले होते. तसेच इच्छुक उमेदवारांनीसुद्धा मतदार नोंदणी सुरू केली होती. बऱ्यापैकी नोंदणीचे कामही आटोपले होते. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदारांसाठी जेवणावळींसह शिक्षकांचे मेळावेसुद्धा घेतले होते; परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. शाळा, महाविद्यालयांना २२ मार्चपासून सुटी देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे निवडणुकीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नियोजित वेळी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. अद्यापर्यंतही निवडणूक आयोगाकडूनही निवडणुकीबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही; परंतु निवडणूक कधीही होईल, या आशेवर इच्छुक उमेदवारांनी शिक्षकांसोबत संपर्क कायम ठेवला आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.या संघटना निवडणुकीच्या तयारीत!४विधान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिक्षक संघटना सज्ज आहेत. जुलै महिन्यात निवडणूक होईल. या अपेक्षेने शिक्षक संघटनांनी उमेदवारसुद्धा रिंगणात उतरविले आहेत.४निवडणुकीसाठी राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, विदर्भ ज्युनिअर टिचर्स असोसिएशन (विजुक्टा), भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना आदींनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. या सर्व शिक्षक संघटनांनी उमेदवारांच्या नावांची घोषणासुद्धा केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक