शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

By नितिन गव्हाळे | Updated: August 1, 2024 00:37 IST

आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला प्रकरण, १३ जणांवर गुन्हे दाखल, इतर फरार.

नितीन गव्हाळे, अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न करीत, त्यांच्या कारची तोडफोड केली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हे दाखल केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षासह एकास अटक केली. सत्र न्यायालयाने बुधवारी तिघांना जामिन मंजूर केला.

मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे मनसेची पक्षाचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे विश्रामगृहावर आले असल्याची माहिती मिळाल्यावर मनसैनिकांनी ते थांबलेल्या कक्षात मोर्चा वळविला आणि शिवीगाळ आणि एकेरी भाषा वापरत, त्यांनी मिटकरी बसलेल्या कक्षाचा दरवाजा ठोठावला. परंतु तेथील कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना आत शिरू दिले नाही. त्यामुळे नारेबाजी करीत, मनसैनिकांनी बाहेर उभ्या असलेल्या आमदार मिटकरी यांच्या कारवर दगडफेक करीत, कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, दीपक बोडखे, कर्णबाळा दुनबळे, अरविंद शुक्ला, ललित यावलकर, मंगेश देशमुख, जय मालोकार, रूपेश तायडे, योगेश वाघमारे, मनसे महिला आघाडी प्रमुख प्रशंशा अंबेरे, सचिन गालट, मुकेश धोंडफळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यापैकी साबळे, भगत व बोडखे यांना पोलिसांनी बुधवारी अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही जामिन मंजूर केला. उर्वरित मनसैनिक फरार आहेत. जय मालोकार यांच्यावर गावी अंत्यसंस्कारमंगळवारी दुपारी झालेल्या हल्ला प्रकरणात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार(२७) हेसुद्धा सहभागी झाले होते. मंगळवारीच दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास, त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने, खाजगी रूग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात निंबी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. अमित ठाकरे घेणार जयच्या कुटूंबियांची भेटमंगळवारी झालेल्या तोडफोड प्रकरणानंतर विद्यार्थी सेनेचा जय मालोकार यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांचा नाशिक येथील दौरा रद्द केला आहे. अमित ठाकरे हे गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कारने अकोल्यात येणार आहेत. अकोल्यातून ते निंबी येथे जाऊन जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन करणार आहेत.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरी