शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:53 IST

राष्ट्रीय अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

अकोला: जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती जमीरउल्लाखा पठाण यांच्या हिवरखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला वाहक शीला सफल वाकोडे यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णावाहिका उपलब्ध न झाल्याने राष्ट्रीय अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत दिला.अकोट एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत असलेल्या शीला सफल वाकोडे यांना १४ जून रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या, तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास होता. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना खासगी वाहनाने जवळच असलेल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर उपस्थित नव्हते. प्रकृती बिघडत असल्याने उपस्थित परिचारिकेने त्यांना संदर्भसेवेसाठी अकोट येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची विचारणा करण्यात आली. त्यावेळी १०८ रुग्णवाहिका पंक्चर होती. सोबत स्टेपनी नसल्याने दुसºया गावातील रुग्णवाहिका बोलवावी लागेल. त्यासाठी दीड-दोन तास लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी नाइलाजास्तव खासगी वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच या महिलेचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. अकोट येथे पोहोचताच तेथील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या बाबीवर आरोग्य विभागाच्या कार्यकारी सभेत चर्चा झाली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद