शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:20 IST

अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला.

अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्यांचे निवारण करून योजना मार्गी लावण्याचा सल्ला अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना दिला.अकोल्यातील निवासस्थानी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि अडचणींसंदर्भात त्यांनी पदाधिकारी व सदस्यांकडून आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा टंचाई निवारणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे निवारण करून दलित वस्ती सुधार योजनेसह इतर योजना मार्गी लावून, लोकांची कामे करण्याचा सल्ला अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना दिला. यावेळी भारिप-बमसं नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह भारिप-बमसंचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.निवडणुकीच्या कामाला लागा; भारिप पदाधिकाऱ्यांना सूचना!भारिप-बमसंच्या जिल्हा पदाधिकाºयांसह जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी व अकोला शहर पदाधिकाºयांच्या बैठका घेत, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. पक्षाचे संघटन आणि बुथ कमिट्यांसंदर्भात त्यांनी पक्षाच्या संंबंधित पदाधिकाºयांकडून माहिती घेतली. पक्षाचे संघटन बळकट करण्याच्या कामाला गती देऊन, आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा सल्लाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांना दिला. निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावादेखील त्यांनी घेतला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkola ZPअकोला जिल्हा परिषद