शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातून लढण्यावर आंबेडकर ठाम: सोलापूरच्या निर्णयावर १५ ला भाष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:25 IST

‘मी जिथून लढतो ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही’, अशा शब्दात त्यांनी अकोल्यात उमेदवारी कायम राहील, हे स्पष्टच केले; मात्र सोलापुरातून लढण्याबाबत १५ मार्चला अंतिम निर्णय घेऊ, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी माझी उमेदवारी सोलापुरातून जाहीर केली आहे. मी सोलापुरातून लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तो मंगळवारी दूर करीत ‘मी जिथून लढतो ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही’, अशा शब्दात त्यांनी अकोल्यात उमेदवारी कायम राहील, हे स्पष्टच केले; मात्र सोलापुरातून लढण्याबाबत १५ मार्चला अंतिम निर्णय घेऊ, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.अकोल्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मला सहा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याबाबत ‘चॉइस’ देण्यात आला आहे. सोलापुरात तर लक्ष्मण माने यांनी उमेदवारीच जाहीर केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत; मात्र त्यामुळे अकोला सोडणार नाही. जिथून मी आतापर्यंत लढत आलो, ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही किंवा या जागेवर माझ्या कुटुंबातील कोणी उमेदवार राहणार नाही, हेसुद्धा यानिमित्ताने स्पष्ट करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राखीव मतदारसंघात लढण्यास काय हरकत आहे?मी कधीही राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविली नाही; मात्र कधीच लढणार नाही, असे नाही. त्या मतदारसंघातूनही लढून पाहता येईल, असे विधान करून अ‍ॅड. आंबेडकरांनी सोलापुरातील उमेदवारीबाबत संभ्रम कायमच ठेवला आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAkolaअकोलाPoliticsराजकारण