शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:03 IST

महावितरणने अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले.

अकोला : बेरोजगार विद्युत अभियंत्यांना थेट लॉटरी पद्धतीने काम देण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने महावितरणनेअकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले.महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय ' विद्युत भवन 'येथे आमंत्रित बेरोजगार अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने या कामांचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा विकास नियोजनातून अकोला ग्रामीण विभागात करावयाचा कामाचा समावेश आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या उपस्थितीत बेरोजगार अभियंतांना द्यावयाच्या कामाच्या लॉटरीची सोडत करण्यात आली. यात आमंत्रित केलेल्या २९ बेरोजगार अभियंत्यांना सुमारे १ . ८३ कोटींच्या कामाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता गोर्ले यांच्यासह सर्व बेरोजगार अभियंते उपस्थित होते.अकोला मंडळ कार्यालयाने गत चार वर्षात २९ सुशिक्षीत बेरोजगार अभियंताना सुमारे ४.२ कोटीची विजेची कामे देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अकोला मंडळ कार्यालयात रोजगार मिळावे म्हणून ३५ सुशिक्षीत बेरोजगार अभियंतानी आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे.बेरोजगार अभियंत्यांना १० लाख रुपयापर्यंतची कामांची लॉटरीविद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणतर्फे १० लाख रुपयापर्यंतची कामे बिना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरण आहे . या धोरणानुसार वर्षभरात एका अभियंत्याला १० लाख रुपयाची ५ अशी एकून ५० लाख रूपयाची कामे देण्यात येतात. ही कामे विहीत मुदतीत यशस्वीरित्या पुर्ण केल्यास पुढिल वर्षी १५ लाख रुपयापर्यंतची पाच अशी एकून ७५ लाख रूपयाची कामे लॉटरी पद्धतीने दिल्या जाणार आहेत. या धोरणानुसार मागिल चार वर्षात राज्यातील शेकडो बेरोजगार अभियंत्यांना ११ हजार ८५२ लाखाची १ हजार ९९८ कामांचे वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळAkolaअकोला