शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शतप्रतिशत भाजपाला युतीधर्माचा अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:19 IST

युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा मनाने अन् मोदी लाटेने एकत्र आल्यामुळे आता विधानसभेत युती कायम राहील यात कोणालाही शंका नाही. त्यामुळेच आता युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शतप्रतिशत भाजपा हा नारा दिला होता. यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यासाठी भाजपा सरसावली. त्यामध्ये अकोला अग्रेसर होता. अकोला जिल्ह्यात भाजपाने निर्माण केलेले एकहाती वर्चस्व हे भाजपाने स्वबळावर मिळविलेले यश ठरले. काँग्रेससारख्या मोठे नेटवर्क असलेल्या पक्षालाही भाजपासमोर नामोहरम व्हावे लागले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत शतप्रतिशत भाजपा हा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रणशिंग फुंकले होते; मात्र लोकसभेसाठी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागणार आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती मध्ये सर्वात आधी जागा वाटपाचा गुंता निर्माण होऊ शकतो. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघां पैकी भाजपाने चार मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला एक मतदारसंघ भाजपाला देणे सहज शक्य आहे; मात्र सेनेचा बाळापूर, अकोट अशा दोन मतदारसंघावर दावा आहे. तसेच अकोल्यातील शहरी मतदारसंघ असलेला अकोला पश्चिमही मिळावा, असे प्रयत्न आहेत. बाळापुरात भाजपाचे आमदार नसल्यामुळे हा मतदारसंघ सेनेला देण्यात भाजपाला अडचण येणार नाही; मात्र अकोट व अकोला पश्चिममध्ये भाजपाचे सर्वात ज्येष्ठ आमदार प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ऐनवेळीसेनेची एकाच मतदारसंघावर बोळवण होण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर भाजपासमोर सेना बंडखोरांचे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचे अकोल्यावर वर्चस्व असले तरी युतीमध्ये सेनेला तसेच घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्याही अपेक्षांचे ओझे भाजपावर राहणार आहे. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी भाजपाला बॅकफुटवर यावे लागणार आहे.

अरविंद सावंत यांची करडी नजरशिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून खा. अरविंद सावंत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत झाली. हेडमास्तरांच्या भूमिकेत सावंत यांनी शिवसैनिकांना शिस्त लावली. आता सावंत यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्यामुळे त्यांच्याही शब्दाला अधिक वजन प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या घडामोडीवर त्यांची करडी नजर राहणार असल्याने सेनेला सन्मानजनक वाटा मिळेल, अशी आशा शिवसैनिकांना आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाAkolaअकोलाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण