शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या तीनही अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:41 IST

न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून आता त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला: औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप क रुन घोटाळा करणाºया तीनही बडया अधिकाºयांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावनी झाली. न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून आता त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉर्ड्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील रा. उमरेड जि. नागपूर, अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. मालेवाडा रोड नागपूर या पाच बड्या अधिकाºयांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाºयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली. या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाºयांविरुद्ध भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाची कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सांगून एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्वारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना वाटप कल्याचे दाखविले. हा घोळ सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन याने केला. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली तर उर्वरित तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या फरार आरोपींना अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ सुरु केली मात्र न्यायालयाने तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. यामध्ये कुंदा किशोर वासनिक अमरावती,कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. सुधीर कॉलनी अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. नागपूर या तिघांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय