शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच निवडणुकांचा खर्च पक्षांनाही द्यावा लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:56 IST

पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत केलेला खर्च सर्वच राजकीय पक्षांकडून मागविण्यात आला आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील कोणत्याही निवडणुकीत लढतीमध्ये उमेदवार असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना स्वतंत्रपणे निवडणुकीचा खर्च द्यावा लागणार आहे. त्यासोबतच निवडणुकीनंतर जाहीरनाम्यातील किती आश्वासनांची पूर्तता केली, याचा अहवालही निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत केलेला खर्च सर्वच राजकीय पक्षांकडून मागविण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नोंदणीकृत मान्यताप्राप्त तसेच इतर नोंदणीकृत अमान्यप्राप्त पक्षांची एकूण संख्या २६३ एवढी झाली आहे. या पक्षांच्या कामकाजाबाबत आयोगाकडून दिलेल्या आदेशाबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याचे स्पष्टीकरण आयोगाने ९ जानेवारी रोजीच्या पत्रातून दिले आहे. त्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संबंधित पक्षांनी उमेदवारांसाठी केलेल्या खर्चाचा तपशील संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्याचे बजावले आहे. त्यामुळे उमेदवारांशिवाय पक्षालाही निवडणूक खर्च द्यावा लागणार आहे. निकाल लागल्यापासून ६० दिवसांच्या आत स्थानिक कार्यालयांनी त्याबाबत दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले.विशेष म्हणजे, निवडणुकीदरम्यान मतदारांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा वार्षिक पूर्तता अहवाल संबंधित राजकीय पक्षांना जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावा लागणार आहे. जाहिरात किंवा पक्षाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्याची प्रत आयोगाला द्यावी लागणार आहे.सामाईक चिन्हासाठी अर्जस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यातील २६३ पक्षांच्या निवडणूक लढणाºया उमेदवारांना एकच सामाईक चिन्ह हवे असल्यास नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तीन दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागेल.वंचित बहुजन आघाडीचा पत्ता बारामतीविधानसभा निवडणुकीनंतर भारिप-बमसंचे विलीनीकरण वंचित बहुजन आघाडीमध्ये झाले आहे. या पक्षाची अधिकृत नोंदणी झाल्याचा आदेश ८ जानेवारी रोजी काढण्यात आला. अकोल्यापासून सुरू झालेल्या भारिप-बमसंच्या प्रवासानंतर वंचित बहुजन आघाडीचा मुक्कामी पत्ता आता ‘आकाश, अशोक नगर, बारामती असा झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणElectionनिवडणूक