शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
4
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
5
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
6
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
7
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
8
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
9
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
10
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
11
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
12
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
13
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
14
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
15
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
16
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
17
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
18
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
19
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय

समस्त महाजन संस्था करणार ३७५ गोरक्षण संस्थांचा कायापालट

By admin | Updated: May 12, 2015 01:14 IST

‘समस्त महाजन’चे मॅनेजिंग ट्रस्टी गिरीशभाई शाह यांची विशेष मुलाखत.

शिखरचंद बागरेचा /वाशिम: गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश येथील गोशाळांचे योग्यरीत्या संगोपन केल्यानंतर मुंबई येथील समस्त महाजन या सेवाभावी संस्थेच्यावतीने आता महाराष्ट्रातील सुमारे ३७५ गोशाळांचा कायापालट करण्याचा आपण संकल्प घेतला आहे, असे विचार समस्त महाजन मुंबईचे मॅनेजींग ट्रस्टी गिरीषभाई शाह यांनी १0 मे रोजी जिल्हयातील शिरपूर जैन येथे लोकमतने घेतलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. जैनांची काशी म्हणून जगात सुप्रसिध्द असलेल्या शिरपूर जैन येथे पंन्यास प्रवर दिवंगत ङ्म्री.चंद्रशेखर विजयी महाराज यांचे परम शिष्य व अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थानचे उद्धारक विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त महाजन परिवारच्यावतीने पश्‍चिम विदर्भातील गोशाळा व गोरक्षण संस्था चालकांचे शिबिर विदर्भातील गोशाळा व गोरक्षण संस्था चालकांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरानिमित्त गिरिषभाई शाह यांचे शिरपूर नगरीत आगमन झाले असता प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची ही विशेष मुलाखत घेतली.

प्रश्न : आपल्या संस्थेची स्थापना केव्हा झाली ? उत्तर : सन २00१ मध्ये एक सेवा सर्मपित संस्था म्हणून समस्त महाजन ची स्थापना करण्यात आली, मात्र त्याहीपूर्वीपासून आपण पीडित मानवी, अबोल जीव आणि पर्यावरणासाठी अविरत सेवाकार्य करीत आहोत.

प्रश्न : गोसेवेची प्रेरणा कोठून मिळाली ?

उत्तर : पंन्यास प्रवर गुरुदेव दिवंगत ङ्म्री.चंद्रशेखर विजयी महाराज यांनी अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थान शिरपूर जैन येथेच आपणास गोसेवा तसेच जीवदयेसाठी कार्य करण्यास प्रेरीत केले.

प्रश्न : आपण आतापर्यंत केलेले कार्य..

उत्तर : समस्त महाजनने आतापर्यंत मुंबई गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कश्मिर, उत्तराखंड व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गरजवंतांसाठी सहाय्यता दिली आहे. या शिवाय सुमारे १८ हजार एकर जमिनीत स्वदेशी वृक्षांची लागवड करुन नापिकी जमिनीस नवपल्लवीत केले आहे.

प्रश्न : किती गोरक्षण संस्थांना मदत दिली आहे ?

: गुजरात राज्यातील ६00 पांगरापोल संस्था सोबत राजस्थान ८0 व मध्यप्रदेशातील ६0 गोरक्ष्ण संस्थांना सन २0१४-१५ मध्ये २ कोटी ३0 लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली असून आतापर्यंत समस्त महाजन ने सुमारे १२५ कोटीच्या वर या कार्यात योगदान दिलेले आहे.

प्रश्न : महाराष्ट्र व विदर्भासाठी आपली योजना ?

उत्तर : संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३७५ गोरक्षण संस्थांची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध असून या सर्व संस्थांना प्रतीसंख्या १0 लाख रुपयांची मदत व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

प्रश्न : नेपाळमध्ये आता आलेल्या भूकंपात आपण काही मदत दिली काय?

उत्तर : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर समस्त महाजनने दहा हजार लोकांना जेवण देणे सुरु केले असून दहा हजार ब्लँकेटचे वाटप केले आहे. सुमारे एक हजार घरे बांधण्याचा संकल्प असून भारतीय करंसीमध्ये एका घराची किंमत २५ हजार रुपये तर नेपाळी करंसीमध्ये ४0 हजार रुपये एवढी किंमत होते.

प्रश्न : समस्त महाजन संस्थेच्या ध्येयधोरणांबाबत काय सांगाल ?

उत्तर : समस्त महाजन निस्वार्थ व सर्मपित सेवा देण्यासाठी कटिबध्द असून संपूर्ण भारत देशातीलच नव्हे तर जगात जनधन सुखी व्हावे, प्रत्येक जीव धन सुखी व्हावे व निसर्ग प्रकृती धन सुद्धा नेहमी प्रसन्नमय राहील यासाठीच आपले प्रयत्न आहेत. आणि हेच समस्त महाजनचे ध्येय होय.

प्रश्न : समस्त महाजनच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम ते कोणते?

उत्तर : समस्त महाजनच्यावतीने केवळ गोरक्षणच नव्हे तर विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे. दुष्काळ असो अथवा पुरग्रस्तांना मदत असो, भुकंप क्षेत्र, नैसर्गीक आपत्ती या शिवाय शिक्षणक्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना साक्षर करणे असो गावागावात स्वदेशी वृक्षांची लागवड करुन देशाची भूमी अधिक उपजाऊ करण्यासाठी विशेष अभियान तसेच मानवजाती सह पशु-पक्ष्यांच्या जीवितासाठी कार्य करण्यात समस्त महाजन अग्रेसर आहे.