शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

महान धरणाचे पुन्हा सर्व गेट उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:06 IST

२९ तासात एकूण ११.२४७ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला आहे.

महान :   महान धरणाचे वक्रद्वार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता बंद करण्यात आले होते. या वेळेस धरणात ३४७.५३ मीटर, ८२.४८४ दलघमी व ९५.५२ टक्के जलसाठा उपलब्ध होता; परंतु महान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मालेगाव परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तब्बल १८ दिवसांनंतर १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजता महान धरणाचा जलसाठा ३४७.७० मीटर, ८५.१२४ दलघमी व ९५.५८ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे महान धरणातील 10 दरवाजे उघडण्यात आले.काटा कोंडाळा नदीमधील पाण्याचा वेग दमदार सुरू असल्याने महान धरणाच्या पाणी पातळीत चांगल्याच प्रमाणात वाढ होत होती. पावसाचा अंदाज व पाणी पातळीत होत असलेल्या वाढीकडे लक्ष देऊन महान धरणाचे १६ सप्टेंबरच्या रात्री १.३० वाजता सर्व १० वक्रद्वार एक फुटाने उघडून एकूण २५५.८३ घनमीटर प्रतिसेकंदाने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. धरणाचे वक्रद्वार उडून पाण्याचा विसर्ग करण्याची ४७ दिवसात ही बारावी वेळ आहे. १ जून ते १८ सप्टेंबर सकाळपर्यंत एकूण ५८०.३ मिमी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. मालेगाव परिसरातून वाहत येणारी काटा कोंडाळा नदीची दुथडी भरमसाठ वाहत असल्याने महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होणे सुरूच आहे. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजता महान धरणाचे सर्व दहाही दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले होते. त्यामधील काही गेट टप्प्याटप्प्याने बंद करून चार गेट सुरू होते. धरणाची पाणी पातळी १८ सप्टेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता ९५.८८ टक्क्यांवर आल्याने सुरू असलेले सर्वच गेट सकाळी ६.३० वाजता तब्बल २९ तासानंतर बंद करण्यात आले असून, २९ तासात एकूण ११.२४७ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला आहे. पाणी पातळीकडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नीलेश घारे, जानोरकार, पिंपळकर, पाठक, हातोलकर, झळके, टेमझरे लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण