शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घुंगशी बॅरेजचे सर्व गेट उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:07 IST

‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मूर्तिजापूर : सातत्याने पूर्णा नदीला येत असलेला पूर लक्षात घेता पाणी अडवून नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘घुंगशी बॅरेज’चे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.१७.४५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण असलेले घुंगशी बॅरेज थोड्या पावसातच साठवण क्षमता ओलांडत असल्याने नदीला येणाऱ्या पुराचा ओघ पाहून पाण्याची साठवणूक करावी लागते; परंतु पूर्णा नदीला सात्यत्याने पूर येत असल्यामुळे १६ जूनपासून सर्वच १० दरवाजे उघडण्यात आले आहेत.या बॅरेजच्या पसाºयानुसार घुंगशीपासून ते नेर घामणापर्यंत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत ५७०.८ मिलीमीटर एवढे पर्जन्यमान झाले, तर शनिवारी ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्णा नदी भरभरून वाहत असल्याने संपूर्ण जलसाठा करणे शक्य नाही. पहिल्याच पावसात ११ जून रोजी ४५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. दरम्यान, १२ जूनला जोरदार पाऊस झाल्याने १३ जून रोजी गेट एक-एक करून उघडण्यात आले. जलसाठा वाढत असल्याने १६ जून रोजी संपूर्ण १० गेट पूर्णपणे उघडण्यात आले होते. तेव्हापासून पावसाचा व पुराचा ओघ सारखा असल्याने संपूर्ण गेट उघडेच ठेवण्यात आले आहे.या संदर्भात नदी काठावरील गावांना व मच्छीमारी करणाऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ४ गेटमधून दीड मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. (शहर प्रतिनिधी)घुंगशी बॅरेजचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहे. पहिल्याच पावसात बॅरेजमध्ये ८० टक्के साठा जमा झाल्याने २० टक्के गेट उघडण्यात आले होते. आता संपूर्ण गेट उघडे असले, तरी नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- संजय पाटील, उपविभागीय अभियंता, घुंगशी बॅरेज

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण