शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील चारही ब्रिटिशकालीन पूल धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:21 IST

बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पुलांचे आॅडिट करण्यासाठी शासन स्तरावरून ‘एसजीसी’कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली असता यामध्ये जिल्ह्यातील चार पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. आॅडिटमध्ये चारही ब्रिटिशकालीन पुलांचे आयुर्मान शिल्लक असले तरी दुरुस्तीअभावी धोकादायक बनल्याचे नमूद आहे. बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.राज्यातील महाड-रायगड मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने २०१७ मध्ये मोठी जीवितहानी झाली होती. त्या पृष्ठभूमीवर तत्कालीन सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. जिल्ह्यातील चार पुलांच्या आॅडिटसाठी एसजीसी कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित कन्सल्टन्सीने पुलांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही दिवसांपूर्वी सादर केला असून, त्यामध्ये चारही पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे नमूद करीत दुरुस्तीसाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. यादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे निर्माण कार्य सुरू आहे.त्यामुळे राज्य महामार्गावरील चारही पूल साबांविने ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित केले आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने होत असल्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून होणारी वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.

पुलांची दर सहा महिन्यांनी तपासणीसार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व १७० पुलांची दर सहा महिन्यांतून तपासणी केली जाते. ब्रिटिशकालीन पूल वगळता इतर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’कडे शुल्क जमा केल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय व राज्य मार्गाचे निर्माण कार्य ‘एनएचएआय’च्या माध्यमातून केले जात असल्याने ‘पीडब्ल्यूडी’ने ब्रिटिशकालीन पुलांचे हस्तांतरण केले आहे. चार पुलांपैकी गांधीग्राम व लोहारा येथील पुलाच्या ऐवजी नवीन पुलाची उभारणी केली जाईल. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आटोपताच पुढील कामाला सुरुवात होईल.-रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता ‘एनएचएआय’

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग