शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास चार वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 19:43 IST

अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या 28 वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला, दि. 28 - मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या 28 वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला. हिरपूर येथील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत तिच्या झोपडीमध्ये 22 जानेवारी 2014 रोजी झोपलेली होती. या झोपडीला तुरीच्या काड्याचे दार असल्याने सदरचे दार उघडून आरोपी पुरुषोत्तम सूर्यभान तायडे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली, त्यामुळे तिच्या वडील आणि भावाने धाव घेऊन आरोपी तायडे यास पकडले.तायडेने दोघांच्या तावडीतून सुटून जाण्यासाठी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या वडिलांना लागल्यामुळे आरोपीस पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पुरुषोत्तम तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 अ, 448 आणि पॉस्को कायद्याच्या कलम-8 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पीएसआय एस.एस. किनाके यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी तायडे यास पॉस्को कायद्यानुसार चार वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिने शिक्षा, तर 354 अ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास, कलम 448 अन्वये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.आरोपी विकृत सवयीचाशिक्षा झालेला आरोपी पुरुषोत्तम तायडे याने हिरपूर येथीलच एक दाम्पत्य झोपलेले असताना त्यांच्या घरात प्रवेश करून विवाहित महिलेचा विनयभंग 31 ऑक्टोबर 2014 रोजी केला होता. यावरून आरोपीची बुद्धी विकृत असल्याचे न्यायालयाने सांगत आरोपीला ही सवयच असल्याचे स्पष्ट केले. विवाहितेच्या विनयभंग प्रकरणातही आरोपीविरुद्ध 354 अ, 452, 506 नुसार गुन्हा दाखल असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.