शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रधानमंत्री घरकुल योजनेत अकोट तालुका प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 02:54 IST

अमरावती विभागात १५ पं.स.ची उद्दिष्टपूर्ती

विजय शिंदे अकोट: शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये अमरावती विभागातून १५ पंचायत समित्यांनी १00 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक उद्दिष्ट घेतलेली अकोट पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम ठरली आहे. केंद्र शासनाने पूर्वीची इंदिरा आवास योजना बंद करून २0१६-१७ पासून प्रधानमंत्री घरकुल योजना अमलात आणली. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना सर्र्वेक्षण २0११ नुसार ग्रामीण भागातील घरकुलासाठी पात्र लाभार्थींची प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी निवड करण्यात आली. अमरावती विभागात ५६ पंचायत समित्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली. यामध्ये अकोट पंचायत समितीला सर्वाधिक १७१५ एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. घरकुल मंजुरातीचे उद्दिष्ट पंचायत समितीने १00 टक्के पूर्ण केल्याने अमरावती विभागात अकोट पं.स. प्रथम ठरली आहे. १00 टक्के उद्दिष्टपूर्ती करणार्‍या उर्वरित १४ पंचायत समित्यांमध्ये तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, घाटंजी, उमरखेड, पातूर, केलापूर, महागाव, बाश्रीटाकळी, कळंब, नेर, दिग्रस, राळेगाव, वणी यांचा समावेश आहे. प्रमुख जिल्हा स्तरावरील अकोला, यवतमाळ, वाशिम या पंचायत समित्यांनी ९९ टक्क्यांच्यावर उद्दिष्टपूर्ती केली आहे. बुलडाणा पं.स. ८४.८५, अमरावती पं.स. ७१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. अकोट पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी जनजागृती करीत नियोजनबद्ध पद्धतीने योजना राबविली. यामध्ये १७१५ लाभार्थींमध्ये अनुसूचित जाती २३७, अनुसूचित जमाती ७८९, अल्पसंख्याक ३९६ व इतर २९३ लाभार्थींना घरकुले मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थींना बांधकामाच्या प्रगतीवर तीन टप्प्यात प्रत्येकी १ लाख २0 हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त मजुरीचा खर्च म्हणून नरेगा योजनेतून २0 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात येतात. लाभार्थींचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत ९८ टक्के लाभार्थींना ३0 हजार रुपयांचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला आहे. अकोट तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अजूनही घरकुलाची कामे सुरू असून, या योजनेंतर्गत कामासाठी लाभार्थी खाते उघडण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांनी संपूर्ण सहकार्य केल्याने व पं.स.च्या सर्व घटकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याने अमरावती विभागात प्रथम ठरल्याची प्रतिक्रिया गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी व्यक्त केली.