शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अकोट बाजार समिती: सभापती, उपसभापतींसह चार संचालक अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:29 IST

अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य दोन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अनियमिततेच्या कारणावरून संचालक पदावरून अपात्र केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देउपविधीचे उल्लंघन करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य दोन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अनियमिततेच्या कारणावरून संचालक पदावरून अपात्र केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अकोट बाजार समितीचे तत्कालीन संचालक व विद्यमान सभापती रमेश बोंद्रे, उपसभापती शंकरराव चौधरी, संचालक मोहन जायले, रामविलास अग्रवाल यांनी पदावर असताना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६३ मधील तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६७ मधील तरतुदींचे व उपविधींचे वारंवार उल्लंघन केले. त्यामुळे ४१ (१) (आय) व (क) अंतर्गत त्यांच्या पदाला अनर्हता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ते संचालक म्हणून पदावर राहू शकत नाहीत. त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधकांनी या तक्रार अर्जावर बाजू मांडण्याकरिता संचालकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीअंती उपरोक्त चार   संचालकांना पदावरून अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अकोट बाजार समिती राजकीय आखाडा झाला असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीमध्ये एकमेकांविरुद्ध तक्रारी, चौकशी, कारवायांना घेऊन कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय मागे पडत आहेत. शेतकर्‍यांना बाजार भावापासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रभावाने बाजार समिती बरखास्त करून जिल्हा उपनिबंधक यांचे प्रशासक नेमावेत, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहेत. 

मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनियमितता झाली होती. या कारणावरून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, उपसभापती व दोन संचालकांना अपात्र ठरविण्यात आले आहे.- प्रकाश लाड, सहकार अधिकारी, अकोला. 

अद्यापपर्यंत अपात्रतेचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. - रमेश बोंद्रे, सभापती, कृ.उ,बा.स.अकोट.

टॅग्स :akotअकोटmarket yardमार्केट यार्ड