शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अकोट : खारपाणपट्टय़ात गारपिटीचा शेतीसह घरांना तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:23 IST

अकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत.

ठळक मुद्देअकोटात  महिला जखमी, एका मेंढराचा मृत्यू ,दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत. गहू, तुरीसह  इतर पिकांना फटका बसला असला, तरी हरभर्‍याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे ५६४ हेक्टर शेती व २७५ घरांचे किरकोळ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनामा करण्याचा आदेश तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांनी दिला. अकोट तालुक्यात इतरत्र तुरळक पाऊस पडला. शेत व रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. यामध्ये खापरवाडी येथील संतोष अवारे यांचे शेतात बाहेरगावाहून मेंढरं घेऊन आलेल्या डोबाळे यांच्या मालकीच्या एका मेंढराचा मृत्यू झाला, तर दोन मेंढरं जखमी झाले आहेत. तसेच  जनाबाई डिगा डोबाळे ही महिला गारपिटीने जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. खारपाणपट्ट्यातील २४ गावांत जोरदार गारपीट झाली. रौंदळा, देवरी, पिंप्री डिक्कर, आसेगाव बाजार, कवठा खु., जऊळका, खापरवाडी बु., सावरा, देऊळगाव, मिर्झापूर, वरुर, कालवाडी, धनगरवाडी, हिलालाबाद, आलेवाडी, बळेगाव, कवठा बु., सावरखेड (उजाड), सावरगाव, खापरवाडी खु., रंभापूर, मंचनपूर, ढगा, विटाळी, करतवाडी या गावात सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान पाऊस व गारपीट झाली. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार अकोट मंडळात ८0 हेक्टर, मुंडगाव मंडळात १३९ हेक्टर, तर आसेगाव बाजार मंडळात ३४५ हेक्टर शेतीचे नुकसान, तर आसेगाव बाजार मंडळात अंदाजे २७५ कवेलू व इतर किरकोळ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांना दिला आहे. या अहवालावरून नुकसानाचा पंचनामा करण्याबाबत गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. तीन कर्मचारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पंचनाम्याचा सविस्तर अहवाल १३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या आसेगाव बाजार, वरुर, सावरगाव या परिसरातील शेतांच्या नुकसानाची पाहणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार विश्‍वनाथ घुगे व तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे यांच्यासह राजू नागमते, भाजप तालुका अध्यक्ष राजेश रावणकार, संदीप उगले, शेतकरी उपस्थित होते.

गारपीटग्रस्तांचा तातडीने  सर्व्हे करा - भारसाकळेतेल्हारा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अकोट मतदारसंघातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे विनाविलंब महसूल आणि कृषी विभागाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दिले आहेत. अकोट मतदारसंघात तूर, कपाशी, गहू, हरभरा व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानीचा सर्व्हे तातडीने करून दिलासा देण्याचे निर्देश आमदार भारसाकळे यांनी अकोट आणि तेल्हारा तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. 

दानापूर परिसरात अधिकार्‍यांची भेट दानापूर : तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या दानापूर, वारखेड, सौंदळा परिसरात उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व तलाठी यांनी भेट दिली. प्रथमदर्शनी या भागात १९३४ हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दानापुरात लिंबा एवढी गार पडल्याने गहु, हरभरा, टोमॅटो, कोबी, वांगे आदींसह इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. 

पातूर तालुक्यात तहसीलदारांनी केली पाहणीपातूर : तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची प्राथमिक पाहणी पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे, बाभूळगावचे तलाठी डी.के. देशमुख, सस्तीचे तलाठी उखळकर, हिंगण्याचे तलाठी धारसकर, चतारीचे तलाठी पवार यांनी प्राथमिक पाहणी केली. तालुक्यातील बाभूळगाव, तांदळी, माळराजुरा, धोदाणी, कोसगाव या भागात गारपीट झाली. 

दिग्रस परिसराला दिली रात्री भेट दिग्रस बु : परिसरातील सस्ती, दिग्रस बु., दिग्रस खु, हिंगणा परिसरात हरभर्‍याच्या आकाराएवढी गार पडली. त्यामुळे,  शेतकर्‍यांचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार डॉ. पुरी व तालुका कृषी अधिकारी मकासरे, तलाठी डी. के. देशमुख यांनी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान भेट दिली. यावेळी सस्ती येथील तलाठी उखळकर, सरपंच वाडेकर, पोलीस पाटील अरुण बदरखे, शेतकरी अंकुश निखाडे, धनंजय देशमुख, कृष्णा मालठाणे, सुनील शेळके, तर दिग्रस बु. येथील ज्येष्ठ शेतकरी रामभाऊ बराटे, गजानन ताले, गणेश ताले, विठ्ठल ताले, गजानन गवई, गणेश धोत्रे, सुधाकर कराळे, कोतवाल गजानन वैराळे, गोपीनाथ ताले, बाळू धोत्रे, देवराव गवई, राजू पारस्कर, दिग्रस खु.च्या सरपंच मंगला इंगळे आदींनी सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :akotअकोट