शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:30 IST

अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे३२ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागाच्या क्षेत्रातील ८ गावांचे अतिसंरक्षित वनक्षेत्रातून अभयारण्याबाहेर पुनर्वसन झाले आहे. या ग्रामस्थांनी अवैधरीत्या २५ डिसेंबर रोजी पुन्हा मूळ गावात प्रवेश केला असून, हे ग्रामस्थ अवैध कृत्य करीत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. दरम्यान पाणवठय़ातील पाण्यामध्ये विष टाकल्यामुळे गव्याचा मृत्यू झाला.  हे कृत्य पुनर्वसित गावात परतलेल्या ग्रामस्थांनीच केल्याचा संशय असल्यावरून उपवनसंक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक व २00  वन कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या रहिवासी परिसराची तपासणी करण्यासाठी  पुनर्वसन झालेल्या धारगड, गुल्लरघाट, बारुखेडा, नगरतास या गावात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी अधिकार्‍यांवर ग्रामस्थांनी हल्ला केला मात्र तो परतून लावत वनाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या घरातून ३५ कुर्‍हाडी, ३५ विळे व लोखंडी गज जप्त करण्यात आले आहे.  दरम्यान वनविभागाने ही कारवाई आकासा पोटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात उपवनसरंक्षक जी. गुरूप्रसाद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

आमच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. विळा, कुर्‍हाड, हे घरीच असते त्याचा वापर प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आम्ही करत नाही. आमच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू असून तो दडपण्याकरीता वनविभाग ग्रामस्थांवर खोटे आरोप लावत आहे. -विष्णू राऊत,पुनर्वसित ग्रामस्थ प्रतिनिधी 

टॅग्स :akotअकोटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प