शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोट : उत्तरीय तपासणीसाठी काढला दफन केलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:40 IST

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला.

ठळक मुद्देमनोज प्रभूदास तेलगोटे यांचा शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर जपसरे यांच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. अकोट शहर पोलिसांनी सखोल तपासा अंती १५ मे र रोजी डॉक्टर कैलास जपसरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.अकोट शहरालगतच्या ख्रिश्चन दफन भूमी मध्ये दफन करण्यात आलेल्या मृतक मनोज तेलगोटे यांच्या मृतदेहाचे उत्खनन करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला.अकोट शहरातील मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर जपसरे यांच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. डॉक्टर जपसरे यांनी चुकीचा उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाला व तो मरण पावल्या नंतर ही त्याला आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे उपचारा साठी पाठवून त्याचे प्रेताची अवहेलना केली , असा आरोप करणारी तक्रार पोलिस स्टेशन अकोट शहर येथे प्राप्त झाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी सखोल तपासाअंती डॉक्टर कैलास जपसरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तपासाचा भाग म्हणून मृतक मनोज तेलगोटे ह्याच्या मृत शरीराचे शवविच्छेदन होणे आवश्यक होते त्या साठी पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत यांची लेखी परवानगी प्राप्त करून शवविच्छेदन करण्या साठी न्यायवैद्यक तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या आदेशाने बुधवारी डॉक्टर सचिन गाडगे व डॉक्टर मनीष साबळे व त्यांचे चमूने अकोट शहरालगतच्या ख्रिश्चन दफन भूमी मध्ये दफन करण्यात आलेल्या मृतक मनोज तेलगोटे यांच्या मृतदेहाचे उत्खनन करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले व प्रेत परत विधिवत दफन करण्यात आले. वेळी पोलिस निरीक्षक गजानन शेळके, नायब तहसीलदार राजेश गुरव, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, मृतकचे नातेवाईक उपस्थित होते, शवविच्छेदन करून मृतकच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यास मदत होणार आहे. सदर संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्याचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत।

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट