शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो मालमत्ता कर जमा करा अन्यथा जप्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:38 IST

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारताच मालमत्ता कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी ३५ पथकांचे गठन केले आहे.

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारताच मालमत्ता कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी ३५ पथकांचे गठन केले आहे. अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तांसह साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यासाठी प्रशासन सरसावल्याची माहिती आहे.महापालिक ा प्रशासनासमोर ५३ दिवसांत ७२ कोटी रुपयांचा थकीत टॅक्स वसूल करण्याचे आव्हान उभे ठाक ले असताना मालमत्ता कर वसुली विभाग वसुलीदरम्यान कुचराई करीत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मालमत्ता कर विभागाची झाडाझडती घेत संबंधित अधिकारी-वसुली निरीक्षकांवर कारवाईचे संकेत दिले होते. ही कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेता मालमत्ता कर विभागाने कोणत्याही परिस्थितीत थकीत रकमेची वसुली करण्यासाठी झोननिहाय पथकांचे गठन केले. यामध्ये तब्बल ३५ पथकांचा समावेश असून, यातील १०५ कर्मचारी कर वसुली व नागरिकांच्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई करणार असल्याची माहिती आहे.असे केले पथकांचे गठनपूर्व झोन- ७ पथकेपश्चिम झोन- ११ पथकेउत्तर झोन- ९ पथकेदक्षिण झोन- ८ पथकेएका पथकात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असून, एकूण १०५ कर्मचारी कारवाई करतील.झोननिहाय १०० जण ‘लक्ष्य’शहरातील डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यावसायिक, व्यापाºयांकडे टॅक्सची सर्वाधिक थकबाकी असल्याची माहिती आहे. प्रत्येक झोनमधील अशा १०० मालमत्ताधारकांची यादी तयार करून पथकांच्या हवाली करण्यात आली आहे.शास्तीला माफी नाही!मनपाच्या सुधारित दरवाढीला राजकीय पक्षांनी विरोध दर्शवित नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केल्या. कराची रक्कम कमी होणार असल्याचा दावा केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. भविष्यात न्यायालय काय निकाल देणार, याबद्दल संभ्रमावस्था असली तरी शास्तीची रक्कम मात्र कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राजकारण्यांच्या दाव्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान अटळ असल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर