शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन मालमत्ता प्रणालीकडे अकोलेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:55 IST

अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे.

अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे. दरम्यान, या प्रणालीचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘पॉस’ मशीनद्वारे कराचा भरणा करण्याचे वसुली निरीक्षकांना निर्देश होते. ‘पॉस’ मशीनच्या वापरामुळे मालमत्ता कराची पावती पुस्तके कालबाह्य करण्याचा प्रशासनाचा मानस होता. खुद्द वसुली निरीक्षकांकडूनही ‘पॉस’ मशीनचा वापर केला जात नसल्याची माहिती आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. काही विशिष्ट प्रभागातील नागरिकांजवळून कर वसुली न करता ती दडवून ठेवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे वसुली निरीक्षकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली होती. २०१६ उजाडेपर्यंत शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अर्थातच त्याचा परिणाम शहर विकासावर झाला. २०१३ पर्यंत मालमत्ता कर विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे या विभागाचा पदभार सांभाळणाºया अधिकाºयांनी निव्वळ स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे उद्योग केले. या सर्व बाबींना पूर्णविराम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर विभागाची गाडी रुळावर आणण्यासाठी विविध उपाय केले. ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर संबंधित स्थापत्य नामक एजन्सीने अकोलेकरांना आॅनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या नागरिकांना या प्रणाली अंतर्गत कर जमा करता येत नसेल, त्यांच्यासाठी घरपोच ‘पॉस’ मशीन पाठवून त्याद्वारे कराचा भरणा करण्याची सोय केली. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित देयकांचे वाटप, कराचा भरणा करण्याच्या प्रक्रियेला एक वर्षाचा कालावधी होत आहे. यादरम्यान, नागरिकांनी आॅनलाइन प्रणालीच्या वापराकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले आहे.‘पॉस’ मशीनचा वापर का?मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर कर वसुली विभागाच्या दप्तरी ३२ हजार मालमत्तांची नोंदच नसल्याचे उघडकीस आले होते. अशा मालमत्तांची नोंद करून त्यावर कर आकारणी केल्यानंतर पावती पुस्तिका कालबाह्य करण्याच्या उद्देशातून ‘पॉस’ मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आला. या मशीनच्या वापरामुळे थकीत कराचा भरणा करताना कोणतीही लबाडी केल्यास त्याची नोंद संगणकाद्वारे निदर्शनास येईल; परंतु वसुली निरीक्षक या मशीनचा वापर करीत नसल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर