शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक एकतेसाठी धावले अकोलेकर!

By atul.jaiswal | Updated: October 31, 2017 16:43 IST

अकोला: भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३० वाजता करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय एकता दौड ला उत्स्फुर्त प्रतिसाद खासदार, जिल्हाधिकाºयांनी दाखविली हिरवी झेंडी

या एकता दौडला हिरवी झेंडी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे ,पोलीस अधिक्षक राकेश कलासागर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांनी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार संजय धोत्रे म्हणाले की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश अखंड राखण्यासाठी परिश्रम घेतले, त्यांच्या परिश्रमामुळे आपला देश अखंड आहे. देशाची सामाजिक एकता राखण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाची निरंतर आठवण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसारकरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले .दौडच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, विविधतामधे एकता हा भारताचा मुलमंत्र आहे. वेगवेगळे धर्म, जात,भाषा,असुनसुध्दा या देशातील नागरिक एकत्र आहे, हिच आपली विशेषता आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये कोणतीही गोष्ट सहन करण्याची शक्ती तसेच ऐकण्याची व जोपासण्याची क्षमता असल्यामुळे आपली एकता आबाधीत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.वसंत देसाई येथुन सुरु झालेली दौड टॉवर चौक,जुने बसस्थानक मार्ग,फतेह चौक,संतोषी माता चौक परत वसंत देसाई स्टेडीयम येथे दौडचा समारोप झाला. या दौडमध्ये जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,पोलीस अधिक्षक राकेश कलासागर ,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामुर्ती ,उपविभागीय अधिकारी संजय खडसे ,शिक्षणाधिकारी प्रकाश मुकंद ,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर ,नेहरु युवा केन्द्राचे हरिहर जिराफे,उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) शेलार मॅडम,जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी सह विविध, शाळेचे विद्यार्थी, आय.एम. ए. चे डॉक्टर्स,खेळाडु यांनी सहभाग घेतला. संचालन क्रीडा अधिकारी देशपांडे , आभार प्रदर्शन समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक